Thursday, 22 December 2016

Rss bjp  का असली चेहरा सामने आ गया है।
नोटबंदी से लोग परेशान है और अब बीजेपी का सूपड़ा साफ होगा आरक्षण विरोधी बयान से ।
वीके सिंह का मंत्री पद निकालकर उसे जेल भेजना चाहिए था।

Nagendra modi

दि. 25 सप्टेंबर 2016 रोजीचा देशोन्नतीमधील `मराठा क्रांती मोर्चे नवा आदर्श, नवी प्रेरणा´ या मथळ्याखालील लेख वाचला. त्यात मा.पुरुषोत्तम खेडेकर साहेब लिहितात की `मराठा समाजाच्या दानावर वा खरकट्यावर अनेक गैरमराठा समाज गब्बर झालेत´ या त्यांच्या वाक्याचा नेमका अर्थ लागत नाही. गैरमराठा म्हणजे ब्राम्हण ही आहे आणि अलिकडेच मराठ्यांनी स्वत:ला बहुजन समाजापासुन दूर केल्याने बहुजन ही गैरमराठाच आहे. मग मराठ्यांच्या खरकट्यावर गैरमराठा गब्बर झालेत हे त्यांना कोणाला बोलायचं आहे?
मा.खेडेकर तर ब्राम्हणांना असं बोलु शकणार नाही, कारण प्रस्थापित मराठ्यांचे एकूणच राजकारण हे ब्राम्हणांच्या खरकट्यावर चालले आहे. अगदी मुख्यमंत्री ही दिल्लीतील ब्राम्हण पक्ष श्रेष्ठींकडुन निवडला जातो, म्हणजे यांच्याकडे कोणतेच अधिकार नाहीत. संविधानिक प्रक्रियेनुसार निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार असतो, हा अधिकार प्रस्थापित मराठ्यांकडुन ब्राम्हणांनी हिसकावुन घेतला आहे आणि ते लोक तो संविधानिक अधिकार मिळविण्याचा प्रयत्न ही करताना दिसत नाहीत. इतकेच काय तर कालपर्यंत मा.खेडेकर साहेबांच्या पत्नी मा.रेखाताई खेडेकर ह्या भाजपाच्या खरकट्यावर निवडून येत होत्या असे बोलले तर वावगे होणार नाही. यावरुन ब्राम्हण मराठ्यांच्या खरकट्यावर गब्बर झाले नसुन प्रस्थापित मराठेच ब्राम्हणांच्या खरकट्यावर गब्बर झाल्याचे दिसते.
तर मग खेडेकरांच्या म्हणण्यानुसार गैरमराठे म्हणजे बहुजन आहेत हे समजते. त्यातही बहुजन म्हणुन स्पष्टता यावी म्हणुन बहुजनांतील obc,sc,st आणि अल्पसंख्यांक यापैकी ते कोणाला बोलतात हे पाहिले पाहिजे. तर यात राष्ट्रवादी काँग्रेस(मराठा)च्या राजकारणामुळे मोठे झालेले मा.छगन भुजबळ ही येतात की काय असा संशय येतो.
आरक्षण हे मराठा बांधवांना मिळाले पाहिजे हे जरी खरं असलं तरी ते इतर जाति बांधवांचा द्वेष करुन मिळत नाही हे देखील लक्षात घेतले पाहिजे. अ.जाति/जमातींना मिळते तर मग आम्हालाही मिळालेच पाहिजे, याचाच दूसरा अर्थ म्हणजे आम्हाला मिळत नाही तर मग त्यांचे ही बंद करा अशा मानसिकतेतुन आरक्षणाची मागणी होताना दिसते, म्हणजे `ते´ गैरमराठा अ.जाति/जमातीचे लोक आहेत का असा ही प्रश्न उभा राहतो.
आणि मग हीच विचारधारा, हीच भूमिका घेऊन आजपर्यंत मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने समाजात काम केले काय...??? आता तर संभाजी ब्रिगेड राजकारणात उतरलेला आहे, काय हीच भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड समाजात जाऊन मतं घेणार...??? आणि अशीच जर त्यांची भूमिका, विचारधारा असेल तर कोणता गैरमराठा संभाजी ब्रिगेडला मतं देणार...??? संभाजी ब्रिगेड पक्ष स्थापनेच्या वेळी मा.गंगाधर बनबरेंनी सांगितलं की संभाजी ब्रिगेड हा बहुजनांचा पक्ष आहे, म्हणजे पहिल्या पंगतीत मराठ्यांनी जेवायचं आणि दुसर्‍या पंगतीत त्यांचं खरकटं खाण्यासाठी बहुजनांना बसवायचं असेच जर करायचे असेल तर मतं मागायलाही मराठेच बघा, गैरमराठा तुमच्या खरकट्यावर जगणारा नाही.
माँसाहेब जिजाऊंची बदनामी ब्राम्हणी डोक्यातून निपजली आणि त्याच ब्राम्हणांना जिजाऊंच्याच जयंती दिनी पाचारण केले जाते. यावरुन तर हेच सिध्द होतं की प्रस्थापित मराठ्यांना जिजाऊंच्या बदनामी पेक्षाही ब्राम्हणांची खरकटी जास्त महत्वाची वाटतात.
भांडारकर संस्थेवर कारवाई करण्यात जे 72 मावळे होते त्यात मराठेत्तर ही होते याचे भान असू द्या, ते काही मराठ्यांच्या खरकट्यासाठी आलेले नव्हते, कदाचित या सर्व गोष्टींचा खेडेकरांना विसर पडला आहे.
मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या बॅनरवर, फलकांवर मराठेत्तर महापुरुषांचे फोटो असतात, जी भूमिका खेडेकरांची गैरमराठ्यांबद्दल आहे तीच भूमिका त्या गैरमराठा महापुरुषांबद्दल ही आहे का याचा ही उहापोह होणे गरजेचे आहे. म्हणजे आम्हालाही वेळीच निर्णय घेणे सोफे होईल.
जातीचा अहंभाव राखून समाज जोडण्याची भाषा करणे म्हणजे समाजाची केवळ फसवणूक आहे.
या सर्वच गोष्टींचा सारासार विचार करुन मा.खेडेकरांनी आपली यापुढील भूमिका मांडावी आणि `मराठ्यांच्या खरकट्यावर अनेक गैरमराठे गब्बर झालेत´ ते नेमके कोण याचा लेखक म्हणुन आणि मा.पोहरे साहेबांनी देशोन्नतीचा संपादक म्हणुन जबाबदारीने उत्तरं द्यावीत, ही अपेक्षा..